नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर सडकून टिका केली आहे. या देशात ‘हिंदुस्तानी’ फक्त काय भाजप कार्यकर्ते आहेत का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ते मुस्लीमांना पाकिस्तानी संबोधतात. सरदारांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून करतात, तर विद्यार्थ्यांना तुकडे तुकडे गँगचे सदस्य, अँटी-नॅशनल संबोधतात. मग असे असेल तर मला समजत नाही प्रत्येक जण दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात ‘हिदुस्थानी’ कोण आहे? केवळ भाजपचे कार्यकर्ते?
They call Muslims as 'Pakistani', Sardars as 'Khalistani', activists as 'Urban Naxal' & students as members of 'Tukde Tukde gang' & 'anti-national'. I fail to understand if everyone is terrorist & anti-national, then who is 'Hindustani' in this country?Only BJP workers?:PDP chief https://t.co/gT07YLMQg5
— ANI (@ANI) November 29, 2020
जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील मुफ्ती यांनी केला.
पीएजीडीच्या उमेदवारांवर निर्बंध घातले जात आहेत. त्यांना प्रचारासाठी बाहेर पडण्याचीही परवानगी दिली जात नाही. अशामध्ये आमचे उमेदवार निवडणुका कशा लढवणार ?, असा सवालही मुफ्ती यांनी केला.