पुणे : महायुतीच्या जागा वाटपात पुरंदरची जागा ही अजितदादांनाच मिळाली आहे. त्याचप्रमाणे मला एबी फॉर्म दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची चर्चा झाली आहे. नंतर शेवटच्या दिवशी सेनेचे विजय बापू शिवतारे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे ही मुळ जागा अजित पवार यांचीच असून शिवतारे यांनीही आम्हाला पाठिंबा द्यावा. असे अजित पवार गटातील संभाजी झेंडे यांनी म्हटलं आहे. महायुतीत अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उभे राहिल्याने यासाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. याचा फायदा आपुसकच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना होईल, असे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजी झेंडे यांनी शिवतारे यांना पाठिंबा देण्यास सांगितले आहे.
हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला एबी फॉर्म दिलेला आहे. आमचा अजूनही प्रयत्न आहे की, त्यांना समजावून सांगावं की याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे कॉंग्रेसच्या उमेदवाराला होता कामा नये. यासाठी त्यांचे अजूनही विनंती करण्याचया प्रयत्नात आहेत. यातच अजित दादांना भेटल्यानंतर त्यांनी तालुक्यातील काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेत. ते येत्या काही दिवसात व्हावेत अशी विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टिका, अजित पवार संतापले, म्हणाले…
तसेच माजी आमदाराला येथील लोक देखील कंटाळले आहेत. एक स्वच्छ प्रतिमा असलेला आणि प्रशासकीय सेवेचा अनुभव असणारा माणूस ३० वर्षे काम करतो आहे. पुरंदर तालुक्याचा विकास करायचा असेल तर आम्हाला याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार पाहिजेत. अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्वक लढत पाहायला पाहायला मिळते आहे. याचा नक्कीच फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आता तरी बैठकीनंतर अर्थातच अजित पवार गटाचे जे उमेदवार संभाजी झेंडे हे देखील निवडणुकीवर ठाम आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…पतीसाठी पत्नी पुतण्याच्या विरोधात प्रचाराला मैदानात उतरली.. कोण मारणार बाजी?
हेही वाचा…बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई
हेही वाचा…प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत ‘मनसे’ कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध..! काय काय केल्या घोषणा ?
हेही वाचा…“बळीराजाला वाचवण्यासाठी राज्यात आघाडीचं सरकार यावं”, शरद पवारांचा विश्वास