वैजापूर शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरसेवकासह लोकप्रतिनिधींनी किटचा वापर करुन करोना तपासणीची सुरुवात स्वतः पासुन करावी व त्यानंतर प्रभागातील सर्व नागरिक, किराणा दुकान, केशकर्तनालय, मेडिकल, सर्व विक्रेत्यांची तपासणी करण्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन आमदार रमेश बोरनारे यांनी केले.
तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे असुन प्रत्येक केंद्राला १०० व प्रत्येक प्रभागाला शंभर टेस्ट किट देण्यात येणार आहेत. या किटच्या सहाय्याने प्रत्येक नगरसेवकाने आधी स्वतःची तपासणी करावी व त्यानंतर व्यावसायिकांनी तपासणी करण्याबाबत जनजागृती करावी, नगरसेवकांनी आपल्या भागात फिरणाऱ्या रिकामटेकड्यांना आवर घालावा अशी सुचनाही बैठकीत करण्यात आली.