पुणे । विशेष प्रतिनिधी : प्रदेश भाजपाकडून आलेल्या संघटनात्मक सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांचे राजीनामे घेण्यात येत आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असा दावा केला जात आहे.
हेही वाचा…“..तर त्यातून सहानुभूतीची लाट निर्माण होईल,” महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उज्वल निकम यांचं मोठं विधान
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील कार्यकाळ संपलेल्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या प्रमुख पदांवर असलेले आणि कार्यकाळ पूर्ण केलेले सर्व पदाधिकारी यांचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे नवोदितांना संधी मिळणार आहे.
हेही वाचा…सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती, अजित पवार संतापले, फडणवीसांनी दिलं उत्तर, सभागृहात एकच शांतता
२०१७ मधील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शहराध्यक्षपदाची धुरा आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली. शहराध्यक्ष पदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता नवीन शहराध्यक्ष कोण होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…“तीन वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत राज्यपालांनी कसा मोडला?”, कोर्टात वारे फिरले, न्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी
दरम्यान, लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांचे बंधू शंकर जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. दि.३ जानेवारी २०२३ रोजी जगताप यांचे निधन झाले. महिन्याभरात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. शंकर जगताप यांनी नेतृत्व कौशल्य दाखवले आणि भाजपा विजय सोपा केला.
नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ‘जगताप पॅटर्न’मुळे निवडणूक जिंकली, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राउत यांनी केला होता. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपाची नव्हे, तर जगताप कुटुंबियांची ताकद जिंकली, अशी चर्चा आहे. त्यामुळे शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी ताकद देवून भाजपा पक्षश्रेष्ठी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार, असे सांगितले जात आहे.
Read also
- हेही वाचा…“सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं”, ठाकरेंचा भाजपला टोला
- हेही वाचा…“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं
- हेही वाचा…जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय
- हेही वाचा.“शीतल म्हात्रे बहिणीसमान, मला आणि माझ्या कुटुंबीयाला प्रचंड मानसिक त्रास झाला,” सुर्वेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं”, 4 पैकी एकच मुद्दा योग्य, न्यायाधीशांची मोठी टिप्पणी