पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर महापौरांचा कक्ष आहे. या ठिकाणी दिवसभर अनेकांची वर्दळ असते. या कक्षातील महापौरांचा पत्रव्यवहार पाहणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे.
महापौर उषा ढोरे यांचा पत्रव्यवहार पाहणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून या महिलेला त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी चाचणी केल्यानंतर हा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान गेल्या आठवड्यात महापौर ढोरे यांनी कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.