पिंपरी : पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या लाचलुटपत प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर अजित पवार उत्तरले, म्हणाले…
भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी पिंपरी-चिचवडला भेट दिली व तेथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपुर्ण सहकार्य करावे, अशी सुचनाही चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रा मागील चेहरा समाजापुढे उघड होईल असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीचे सभापती व भाजपचे नगरसेवक नितीन लांडगे यांच्यासह चार जणांना एसीबी पथकाने अटक केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी सुनियोजित षडयंत्र रचुन स्थायीच्या अध्यक्षांना जाळ्यात अडकवल्याचा भाजपकडून आरोप होत आहे. तर, भाजपने पिंपरी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनवले असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
Read Also :
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी
- राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
- ब्रेकिंग! पारनेर तहसिलदाराने आमदार लंकेच्या जाचाला कंटाळून दिला आत्महत्येचा इशारा!
- गडकरींच्या ‘त्या’ पत्रावर मुख्यमंत्र्यांनी, गडकरींच्याच उपस्थितीत सोडले मौन; म्हणाले “विश्वासघात…”