शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या (२७ जुलै) रोजी वाढदिवस असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने मानखुर्दमध्ये ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ आयोजित करण्यात आले. धारावी परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी तयारी दर्शवली आहे.
मानखुर्दमध्ये 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी, कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला शुक्रवारपासून (24 जुलै) सुरुवात करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शवली.
मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मुंबईतील ज्या कोरोनामुक्त व्यक्तींना या अभियानात सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी जवळच्या शिवसेना शाखेशी किंवा 9321586566 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले.
तुम्ही जिंकलात…
आता वेळ आहे इतरांना जिंकविण्याची!!!#करू_संकल्प_प्लाझ्मा_दानाचा!#DonatePlasma#WarAgainstVirus #FightAgainstCovid@CMOMaharashtra @ShivSena pic.twitter.com/QSXVExcAt0— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) July 26, 2020