येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची (NDHM) घोषणा करू शकतात.
एनडीएचएमच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाचं वैयक्तीक आरोग्य पत्रक तयार करण्यात येईल. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवली जाईल. यामध्ये डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचीही नोंद असेल.
या मिशनमध्ये चार महत्त्वाची वैशिष्ट्यं असतील. हेल्थ आयडी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड्स, डिजी रेकॉर्ड्स, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री ही या योजनेची चार ठळक वैशिष्ट्यं असू शकतात. या योजनेत ई-फार्मसी आणि टेलिमेडिसीन सेवांचा समावेशदेखील करण्यात येईल. यासाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे.