मुंबई : शिवसेना नेते आणि नगरसेवक यशवंत जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लवकरच भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मुंबईतील भाजप नगरसेवक पक्षात नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेतील भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट यशवंत जाधव यांनी केला आहे. डिसेंबर मध्ये धमाका होणार असून, आम्ही सुद्धा ऑपरेशन करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे
‘मी एक सांगतो आहे की, मुंबई महापालिकेत असलेले भाजपचे काही नगरसेवक निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्वाचा मनमानी कारभार, त्यांना कुठेही विचारात न घेणं, त्यांना डावलणं, यातून त्यांची निराशा होत आहे. परिणामी अशी मंडळी निश्चितपणे वेगळा विचार करत आहेत. त्याचा जो निकाल आहे तो डिसेंबरला मुंबई शहराला कळेल. भाजपची ही मंडळी शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जे नेतृत्व आहे ते त्यांना जुमानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा आधार वाटतोय’, असा दावा यशवंत जाधव यांनी केलाय.
गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
मागील निवडणुकीत मनसेला राज्यात चांगलं यश प्राप्त करता आलेलं नाही. मात्र, आगामी निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. राज ठाकरे स्वत: या महापालिकांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. गेल्या महिनाभरात नाशिक, पुण्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे. 23 ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 1
अभासे – 1
Read Also :
- शेवटच्या क्षणी काँग्रेस वगळता इतर पक्षांची युती होऊ शकते – गिरीष महाजन
- पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या दोन्ही आमदारांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मैदानात!
- तीन हजार रोख, मटण-मासे पार्टी, पत्ते खेळायला पैसै! शिवसेना आमदाराने उलगडलं निवडणुकीचं गणित
- गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
- भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार