नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत.
नाशिक-हिंगोलीत राष्ट्रवादीलासांगलीच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांना हटवा! भाजपची आक्रमक मागणी
माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपात गळचेपी होत असून बोलू दिलं जात नसल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे भाजपला नाशिकमध्ये पहिला धक्का देणार आहेत. प्रथमेश गिते हे शिवसेनेत कधी प्रवेश करणार याबाबतची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र ते भाजपमध्ये नाराज आहेत हे मात्र निश्चित आहे.
“आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपमध्ये घरवापसी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली पाहायला मिळली.
कोरोना संकटात महाराष्ट्राला सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही – उद्धव ठाकरे
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्यानंतर, खवळलेल्या शिवसेनेने आता भाजपला धोबीपछाड देण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे बडे नेते असलेले सुनील बागुल आणि वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Read Also :
- वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही; नारायण राणेंनी पुन्हा ललकारले
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
- पोलीस आणि गुंडांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार चाललंय – चंद्रकांत पाटील
- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – उद्धव ठाकरे
- देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; शिवसेना- भाजपात नेमंक काय चाललयं?