मुंबई – काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे.
आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरील निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी इच्छा असल्याची राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि व्यक्त केली. तसेच हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपशी चर्चा करू असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच प्रज्ञा सातव या विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. राहुल गांधी प्रत्येक निर्णय घेताना राजीव सातव यांच्याशी चर्चा करायचे. या दोन्ही नेत्यांची चांगली मैत्री होती. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. दरम्यान, मधल्या काळात प्रज्ञा सातव यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती.
आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा
राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यता आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती.
Read Also :
- “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”
- ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
- केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
- “अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
- समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट