परभणी : शहरातील जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. याच पुतळ्याजवळील संविधानाची ठेवलेली प्रतची विटंबना करत एका माथेफिरूनी उचलून बाजूला ठेवली. यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी संपप्त होत काल संध्याकाळीच रेल्वे रोको तसेत घटना स्थळी रस्ता रोको करत घटनेचा निषेध केला. काल संपुर्ण दिवसभर ही घटना घडत गेली. त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. तरीदेखील काही लोक रस्त्यावर उतरल्याने हे आंदोलन पेटले आहे.
हेही वाचा…“पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही”, जयंत पाटलांची सरकारवर टिका
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला कालच जमावाने पकडून त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर आंबेडकरी अनुययांकडून आंबेडकर पुतळा शेजारी जोरदार निदर्शने करत घटनेचा निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली. यातच काल ठिकठिकाणी टायर जाळत काल रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन केले. त्यावर आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पंचांग पाहून निर्णय घेतील, खडसेंबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
परभणीत जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून समाजकंटकाला अटक केली आहे. मी सर्वांना विनंती करतो की, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा. येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
आज संपुर्ण परभणीत बंद ची हाक देण्यात आली होती. तरीही देखील काही आंदोलक रस्त्यावर उतरले. यात पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. या आंदोलनात महिलांचाही समावेश दिसून आला. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर बंदला हिंसक वळण लागले आहे. काही ठिकाणी दगडफेक, तर काही दुकानांची जाळपोळ देखील यावेळी करण्यात आली आहे. यातच आता आंदोलकांना शांत करण्याचे आवाहन विविध राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“परभणी बंद ला हिंसक वळण”, दगडफेक, दुकानांची केली जाळपोळ
हेही वाचा…“उद्या अंगावर लाठ्या- काठ्या घेण्याची वेळ आली तरीही…” रूपाली चाकणकरांची पोस्ट चर्चेत
हेही वाचा…“गृहमंत्रीपदाबाबतचा आग्रही अजूनही आम्ही सोडलेला नाहीय”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा