पुणे : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha) मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ साली त्यांनी पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय होते.
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
पुणे शहराच्या राजकारणावर गिरीश बापट यांचा मोठा प्रभाव होता. पुणे महानगर पालिकेत नगरसेवक पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९५ पासून २०१९ पर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. बापट यांनी कसब्यासह पुणे शहरात कार्यकर्त्यांचे एक जाळ उभारलं होतं. जात-धर्म इतकंच काय तसेच पक्ष विरहित मैत्रीपूर्ण संबंध गिरीश बापट यांनी गेल्या तीन दशकांपासून जोपासले.
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू गिरीश बापट यांची ओळख होती. पुढे पुणे महापलिकेत तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा कसब्यातून आमदार आणि आता लोकसभेचे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पुण्याच्या राजकारणात बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला. विरोधी पक्षातील आणि पक्षांतर्गत आव्हानांना सहजतेने पार करण्याची त्यांनी खासियत होती. आणीबाणीमध्ये नाशिक जेलमध्ये १९ महिन्यांचा कारावास देखील त्यांनी भोगला होता.
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी गिरीश बापट यांनी आजवर यशस्वीपणे पेलली. कॉंग्रेसचे सुरश कलमाडी असो कि राष्ट्रवादीचे अजित दादा निवडणुकी पुरता विरोध, मात्र मतदारसंघाची कामे करून घेण्यासाठी त्यांनी सुसंवाद जपला होता. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराने मोठे नेतृत्व गमावले आहे.
Read also
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स