कोव्हिड लॅबमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीत उघडकीस आला हे. त्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे एक व्हिडोव पोस्ट करत या प्रकरणावर आपले संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “अमरावतीतील बडनेरा येथे एका मुलीच्या गुप्तांगामधून स्वॅब काढण्याचा प्रकार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. राज्यात रोज ज्या भयावय घटना घडत आहेत त्या थांबवाव्या लागतील. अन्यथा जनतेचा राज्यात उद्रेक होईल आणि सरकारला ते आवरणे कठीण होईल. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही!” असे प्रवीण दरेकर म्हणाले.
अमरावतीतील बडनेरा येथे एका मुलीच्या गुप्तांगामधून स्वॅब काढण्याचा प्रकार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. राज्यात रोज ज्या भयावय घटना घडत आहेत त्या थांबवाव्या लागतील. अन्यथा जनतेचा राज्यात उद्रेक होईल आणि सरकारला ते आवरणे कठीण होईल. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही! pic.twitter.com/BTabn7Otrk
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 30, 2020