मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी, पुण्यातल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना, ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू असून, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी, ‘महिलांची माफी मागावी नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचे आम्ही थोबाड आणि गाल रंगवू,’ असा इशारा दिला आहे.
प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं असून, ‘दरेकर जे बोलले ते बोलीभाषेत बोललं जातं. त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही. दररोजच्या बोलण्यात असे वाक्यप्रचार आपण वापरत असतो. त्यामुळे, उगाच पराचा कावळा करुन, याचा वेडावाकडा अर्थ काढू नये. त्यांच्या मनात अश्लील अर्थ नक्कीच नव्हता”, अशी प्रतिक्रया त्यांनी दिली आहे.
करुणा शर्मा यांची न्यायालयात सुनावणी, आज होणार फैसला सुटणार की अडकणार?
‘त्यांच्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीला, ‘श्रीमंतांचा पक्ष’ म्हणत, त्यांना गोरगरिबांची कीव वाटत नाही, असं म्हटलं. राष्ट्रवादी पक्ष कसा श्रीमंतांचा, सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा आहे हे दरेकरांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आणि मग तो वाक्यप्रचार वापरला. त्यामुळे, या सगळ्यानंतर त्याचा अन्वयार्थ वेगळा लागतो. तो आपल्या मनाप्रमाणे काढू नये आणि तसं करून त्याचा बाऊ करण्यात येऊ नये,’ अशी सारासारव करणारी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
शिवसेनेच्या “मुका” नंतर आता भाजपचा “मुका” वादाच्या भोवऱ्यात.!
प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, १६ सप्टेंबरला त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, काल शिरुरमध्ये दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी, त्यांनी पुणेकरांच्या या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर, भलतंच बोलून गेले असल्याची चर्चा आहे. मात्र, यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून, भाजपची मात्र गोची झाल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- ‘…म्हणूनच पवारांनी राष्ट्रवादीची नवी माडी बांधली,’ दानवेंचा काँग्रेसला जोरदार टोला
- पिंपरी चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप; भाजपचे बडे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार
- मृत्यू दाखल्याची कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन; सत्तारांनी ग्रामसेवकाला भरला दम
- मोठी बातमी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे ५ ऑक्टोंबरला मतदान, निवडणुक आयोगाची घोषणा
- शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचे खुले आवाहन