नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना केलेल्या एका ट्विटमुळे कंगना चर्चेत आली आहे. पंतप्रधान म्हणजेच देश असून, ते देशाच्या पित्यासमान असल्याचे कंगनाने म्हटले आहे.
भारतात कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली असून, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. अशा स्थिती मोदी सरकारवर चारही बाजूंनी टीका होत आहे. अशातच कंगनाने मोदींवर टीका करणाऱ्यांना उत्तर देत पंतप्रधान मोदी पित्यासमान असल्याचे म्हटले आहे.
निवृत्त आयएएस अधिकारी सुर्याप्रताप सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना कंगनाने म्हणाली की, पंतप्रधान म्हणजेच देश आहे. ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत असा विचार चुकीचा आहे. असं असेल तर मग लोकशाहीचं ढोंग का करावं?
प्रधानमंत्री ही देश है??
कंगना जी, जो कोई भी आपके लिए ट्वीट लिख रहा है उसने 8वीं कक्षा तक भी ‘नागरिकशास्त्र’ की किताब नहीं पढ़ी है।
लोकतंत्र शासन का वह प्रकार है, जिसमें प्रभुत्व शक्ति समष्टि रूप में जनता के हाथ में रहती है, जनता अन्तिम नियंत्रण रखती है।
कृपया और पढ़ाई करें।🙏 https://t.co/YcEqbWa6po
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) April 24, 2021
मतदान करत एक प्रतिनिधी निवडण्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च का करावा? पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत. त्यांच्यावर शंका आणि किंवा त्यांचा पराभव किंवा पराभवाची इच्छा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे, असे म्हणत कंगनाने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
मात्र कंगनाचे ट्विटमधील अनेकांना पटले नाही. सुर्य प्रकाश सिंग यांना देखील कंगनाला सडेतोड उत्तर देत उभ्यास करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानच देश आहे ? कंगना जी, तुमच्यासाठी जो कोणी ट्वीट लिहित आहे, त्याने ‘नागरिकशास्त्र’चे पुस्तक आठवीपर्यंतही वाचलेले नाही. लोकशाही हा शासनाचा एक प्रकार आहे, ज्यात संपूर्ण शक्ती ही जनतेच्या हातात असते, जनता अंतिम निर्णय घेते. कृपया अजून अभ्यास करा, असा सणसणीत टोला त्यांनी कंगनाला लगावला.