म्हापसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज गोव्यात येत आहेत. ते म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील बोडगिणी मैदानावर ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे.
नितेश राणेंची प्रकृती आणखी बिघडली; संध्याकाळी होणार सिटी अँजिओग्राफी
म्हापश्यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर जाहीर सभा घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या या मोदींच्या सभेची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली असून ही सभा कोरोना नियमांचे पालन करत जंगी स्वरूपात करण्याचे भाजपने नियोजन केले आहे. भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आले असून सभेच्या ठिकाणाच्या जवळच हेलीपॅड बनवण्यात आले आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमणार; राज्य सरकारचा निर्णय
दरम्यान, ही सभा गोवा भाजपसाठी बुस्टर डोस प्रमाणे काम करणार आहे. यासाठीच ठिकठिकाणी स्क्रीन्स लावून या सभेचे प्रसारण गोव्यातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे देखील नियोजन प्रदेश भाजपने केले आहे.
Read also:
- नागपूरात नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन; भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
- मुंबईत शिवसेनाच दादा आहे, टीका करायचं काही कारण नाही; संजय राऊतांनी पुन्हा ठणकावलं
- एकनाथ शिंदेचा वाढदिनीच भाजपला जोरदार धक्का; भाजपच्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
- तुम्ही मुंबईचे दादा मातोश्रीपुरतेच आहात; नारायण राणेंचा संजय राऊतांना खोचक टोला
- ‘लांडेवाडीच्या घाटात या’ मग बघू कोण कोण बसतंय घोडीवर? शिवाजीराव आढळरावांचे कोल्हेंना खुले आव्हान