पुणे: पुणे महानगरपालिका निवडणूक आता दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मार्चमध्ये होणारी पुणे महानारपालिकेची निवडणूक काहीशी पुढे ढकलण्यात आल्याने आता जून-जुलैमध्ये निवडणुका पार पडणार आहेत अशी चर्चा आहे. मागच्या वेळी पुण्यात काहीशी वेगळी राजकीय परिस्थिती होती आणि सध्या पूर्णतः वेगळी आहे. मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडणून आणत सत्ता स्थापन केली होती. यंदा भाजपला सत्ता आणण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना राज्यात सत्तेत असल्याने पुण्यावर सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’; सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर
भाजपच्या गोटात मात्र आता कमालीचा आनंद पसरला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या आमंत्रणाला दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्याने पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात मेट्रोच्या दोन टप्प्यांसह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपच्या अंगात दहा हत्तींचे बळ येणार आहे.
पुण्यातील सर्व शाळा बंदच राहणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्याने भाजपने त्याचबरोबर संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवास योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन यासह इतर कार्यक्रमांचा यात समावेश असेल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट