मुंबई : सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज सत्ताधारी पक्ष चांगलचे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या फोटो त्यांनी जोडे मारून राहुल गांधी यांचा निषेध केला. त्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आहे.
हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा निषेध म्हणून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपसह शिवसेनेच्या आमदारांनी घोषणाबाजी दिल. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. याचे पडसाद विधीमंडळात देखील बघायला मिळालेत.
हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आज सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन केले. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही. असं बाळासाहेब थोरतांनी म्हटलं. त्याचबरोबर आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत. एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले. ज्या गावात बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. स्वातंत्र्य इंग्रजांच्या बाजून लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार ? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
दरम्यान, यातच 2019 च्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणी वरून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना या प्रकरणात दोषी ठरवले आहेत. याचा निषेध म्हणून काॅंग्रेसच्या काही नेत्यांनी मुंबईत निषेध आंदोलन केले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आज निषेध केला.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून हा निषेध नोंदवला. यावेळी भाजप शिवसेना महायुतीचे आमदार उपस्थित होते. pic.twitter.com/6TFXqpewbx— Prasad Lad (@PrasadLadInd) March 23, 2023
Read also
- हेही वाचा…हसन मुश्रीफांना इडीचे पुन्हा समन्स, उद्या परत चौकशी होणार ?
- हेही वाचा…संसदेत ‘संजय राऊतांवर’ शिंदे गट मोठी कारवाई करण्याची शक्यता, थेट लोकसभा अध्यक्षांना पाठवलं पत्र
- हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!