पुणे – लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेले 18 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस व अपक्ष असे 18 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या लोणावळा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. विषेश म्हणजे या नगरसेवकांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याशीही गुप्त बैठकीद्वारे चर्चाही केली. त्यामुळे 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत महत्त्वाची बैठक; आंदोलनावर तोडगा निघणार?
लोणावळा नगरपरिषदेच्या नाराज नगरसेवकांनी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव लोणावळा शहराच्या विकास कामात स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. लोणावळा हे पर्यटनस्थळ आहे. या जागी रहिवास भाग तयार करणे व केबल टाकण्याच्या खोदकामाबाबत नगर सेवकांना विश्वासात घेतले नाही. स्वहितासाठी नगराध्यक्षा जाधव हे विषय वारंवार सर्वसाधारण व विशेष सभेला घेतले.
मात्र, 4 जानेवारी रोजी झालेली सर्वसाधारण सभा आणि त्यानंतर 10 जानेवारीला झालेली विशेष सभा नगरसेवकांनी हाणून पाडल्या. तर पंचवार्षिक काळातील शेवटच्या सभेलाही बहिष्कार टाकणार असल्याची माहिती यावेळी नगरसेवकांनी दिली.
भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला पदाचा राजीनामा
भाजप नगरसेविका अपर्णा बुटाला म्हणाल्या की, सुरेखा जाधव आणि पक्षाचे पदाधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत. आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे नगराध्यक्षा जाधव यांच्यावर नाराज असल्याने नगरसेवक नाराज आहेत. तर ‘विकासाच्या कामात आम्ही सहकार्य करु पण चूकींच्या कामांना आम्ही साथ देणार नसल्याची खंत काँग्रेसच्या नगरसेविका आरोही तळेगावकर यांनी व्यक्त केली. तर आमदार सुनील शेळके यांनीही याबाबत आपले म्हणणे मांडत नगरसेवकांना दिलासा दिली आहे. हे 18 नगरसेवकांनी रविवारी (9 जानेवारी) रात्रीच संपर्क केला. त्यांनी लोणावळा शहरात विकास कामात सुरु असलेल्या चुकीच्या कामांची माहिती दिली.तसेच, चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
Read also:
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
- पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ
- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे