मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज एक दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात जम्बो रुग्णालय कुठे उभारले जाणार, कुठे किती प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली
“प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड दक्षता समिती स्थापन करावी, केंद्राकडून काही वैद्यकीय सवलत सप्टेंबरपासून बंद होणार आहे, ती पुन्हा मिळत राहावी यासाठी प्रयत्न सुरु आहे” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
“सर्व महापालिका आणि वैद्यकीय पथकाची समस्या सोडवू, लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी क्वारंटाईन करणं सध्या आपल्याकडे अवघड आहे. यासाठी हॉटेल उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, आवश्यक असलेले औषध मार्गदर्शक सूचनांनुसार मिळेल” अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.
भाजपच्या वतीने “आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही” असा आक्षेप घेतला. केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले