पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातील कोरोना रुग्णाची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर चार नव्या आयएएस अधिका-यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील करोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता. पुण्यात कोरोना रोखण्यासाठी आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत टेस्टिंग इन्चार्ज म्हणून आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या चारही अधिकार्यांकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा, ग्रामीण आणि कॅन्टोनमेंट हद्दीतील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषि आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान यापूर्वी सहकार आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, साखर आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.