पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशातच आता पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दीपक म्हैसेकर स्वत: होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दीपक म्हैसेकर यांनी खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. दीपक म्हैसेकर हे कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसांपासूनच फिल्डवर काम करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला दीपक म्हैसेकर यांनी कोरोनापासून कशी काळजी घ्यायची, कोरोना रुग्णांची संख्या याबाबतची माहिती सातत्याने पत्रकार परिषदेतून देत होते.पुण्यात विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात कोरोना रोखण्याबाबत रणनिती आखली जात आहे. कोरोना नियंत्रणाच्या सर्व बैठका दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत