पुण्यात 13 ते 18 या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. उद्या रविवार 19 जुलैपासून लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे.
जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी उद्याच्या रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. तर सोमवारपासून दुकानांना सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर दुसरीकडे 23 जुलैपर्यंत दारु दुकानं बंदच राहणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दुकानांसमोर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात विचारविनीमय सुरु होता. त्यानंतर ही शिथिलता देण्यात आली. उद्या १९ जुलै रोजी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकान जसे की किराणा दुकान, मटण, चिकन, अंडी, मांस यांची विक्री सकाळी ८ ते सायंकाळली ६ पर्यंत होणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्येही शिथीलता देण्यात आली आहे. रविवारी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना विक्री करण्यास मुभा आहे.