पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती ४ जुलै रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. महापौराना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवरुन माहिती दिली होती.
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
मात्र नुकताच महापौर मुरलीधर मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे
“कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे.”
कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे. pic.twitter.com/Q4gV5dSkDP
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 9, 2020
वळपास ४ ते ५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र रुग्णालयात असून देखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काम चालूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह व्हिडिओद्वारे पुणेकरांना आधार दिला आपल्याला पुणे शहराला लवकर बरे करायचे आहे, असा विश्वास देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
'मी बरा होतोय, आपल्याला आपलं पुणे शहरही लवकरच बरं करायचंय'
फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याशी साधलेल्या संपूर्ण संवादाची लिंक खाली दिलेली आहे.https://t.co/kTQuMeXcj2
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 8, 2020
मी बरा होतोय, आपल्याला आपलं पुणे शहरही लवकरच बरं करायचंय ! लढूया, जिंकूया !, असे म्हणत त्यांनी नागरिकांना धीर दिला होता. त्यामुळे आता ते स्वतः बरे झाले असल्याने लवकरच पुणे शहरालाही बरं करतील हे नक्की…! त्यामुळे ‘आता मी बरा झालोय, आता पुणे शहरालाही बरं करणार’, असं ठरवूनच महापौर परत आले आहेत.