पुणे : पुणे मेट्रोच्या कामावरुन राष्ट्रवादी-भाजपत सुरु झालेली श्रेयवादाची लढाई अजूनही सुरूच असून, मागील आठवड्यात पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन पार पडल्यांनंतर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करायला उद्या दुपारी ३ वाजता शिवाजीनगर इथल्या मुख्य टर्मिनसवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करायला येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील कोरोना निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर पुन्हा एकदा आमनेसामने
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायल रनच्या कार्यक्रमासाठी, फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं,. त्यावरून पुणे राष्ट्रवादी आणि भाजपत वादंग निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला होता. तसेच, हिरवा कंदील त्यांनी दाखवला, आता उदघाटन पंतप्रधान आणि फडणवीसच करतील, असा इशाराही देण्यात आला होता.
‘नॉट रिचेबल’ देशमुखांच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीची छापेमारी
दरम्यान, मेट्रो ट्रायल रनच्यावेळी, “पुणे राज्याची शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक राजधानी आहे. मात्र आता या ऐतिहासिक नगरीडे, मेट्रोमुळे ‘आधुनिक पुणे’ म्हणून पहिले जाईल, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. तसेच, मेट्रोच्या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही. या ट्रायल रनमुळे आता लवकरच पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
“अत्याधुनिक, आरामदायी प्रवासासोबतच जलद आणि वेळेवर पोहोचवणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करणारी ही ट्रायल रन आहे. पुणेकरांना ठरलेल्या वेळेत आणि इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या या व्यवस्थेसोबतच, त्यांचे वेळेचेही गणित जुळवून ही ट्रायल रन जुळवून आणेल. आता हे काम निर्णायक टप्प्यावर आहे. लॉकडाऊनमध्येही हे काम सुरु होते. त्यामुळे, महामेट्रोच्या पुणे मेट्रोच्या सर्व इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी बांधवांचे आभार, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
Read Also :
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी
- “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात
- मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार