पुणे : मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. यामुळे समाविष्ट २३ गावांसह पीएमआरडीए (PMRDA) हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी बोलविण्यात आलेली पुणे महानगर नियोजन समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. यामुळे पीएमआरडीएचा (PMRDA) विकास आराखडा लांबणीवर पडला आहे. पुढील आठवड्यात आता ही बैठक होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; पण एका मतदारसंघासाठी केवळ एकच तास
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या पुणे महानगर नियोजन समितीची पहिली बैठक सोमवारी (ता. २६) बोलविण्यात आली होती. या बैठकीत २३ गावांसह पीएमआरडीए हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर
मात्र, गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. परंतु, नगर विकास मंत्री शशिकांत शिंदे यांच्या समावेत समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत पीएमआरडीएकडून तयार केलेल्या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Also :
- आघाडी सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त, पूरग्रस्तांना सोडले वाऱ्यावर ; पडळकर यांची खोचक टीका
- थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी