मुंबई : मुंबईतील सहा आणि इतर अशा १३ जागांसाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. आज या सगळ्या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तर काल महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या सभा पार पडल्या. अशातच महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान झाल्याचे दिसून येत आहे. यातच महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबा की पाकिस्तानात मातम सुरू झाला पाहिजे. असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईकरांना केलं आहे.
हेही वाचा…भाजपच्या या सहा राज्यात कमी होणार जागा, भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २० मे ला मतदान करण्याचं आवाहन उदय सामंतांनी मतदारांना केलं आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले की, यातच यंदा मतदान करताना इतकाच विचार करा की, आपण आपलं मत दहशतवादाला, दाऊदच्या हस्तकांना, पाकिस्तान समर्थकांना तर देत नाहीत ना ? लक्षात ठेवा महायुतीला पराभूत करण्यासाठी १९९३ च्या बॉम्बस्फोटांतील आरोपी इक्बाल मुसा महाविकास आघाडीच्या पदयात्रांमध्ये फिरतोय. देशावर अतिरेकी हल्ला करणाऱ्या अजमल कसाब ला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते क्लीन चीट देतायत तर दुसरीकडे ज्यांनी प्राणांची बाजू लावून दहशतवाद्यांना फासावर लटकवलं त्या देशभक्त ॲड. उज्वल निकम यांना देशद्रोही ठरवण्यासाठी काँग्रेसची अख्खी इकोसिस्टीम कामाला लागलीय.
हेही वाचा..“मोदींना आता ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीलाही प्रचाराला बोलवा”
उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत आणि त्यागाचं प्रतिक असलेल्या आपल्या भगव्याला उबाठा ‘फडकं’ म्हणतायत. लक्षात ठेवा, विश्ववंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निक्षून सांगितलं होतं की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..! बस्स, २० तारखेला बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचं बटन इतक्या जोरात दाबायचं आहे की, पाकिस्तानात ‘मातम’ सुरु झाला पाहिजे. असेही सामंतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“या हुकूमशहाचा विषाणूपासून देशाला वाचवायचे आहे”, ठाकरेंचा मोदींवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“ही दोस्ती तुटायची नाय, पण हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको”
हेही वाचा…“तर जय श्रीराम शिवाय यांना काहीच सुचत नाही”, जयंत पाटलांचा खोचक टोला