कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मातबर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर विजय आपलाच होणार असल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. यामुळे विधानपरिषद निवडणूकीच्यानिमित्ताने राजकिय वातावरण ही तापू लागले आहे. याच पार्श्वभुमीवर विधान परिषदचे अर्ज छाननीनंतर पारंपारिक विरोधी गट महाडिक व पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.ही घटना आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे घडली आहे.
अनिल परबांच्या घराबाहेर जनशक्तीच्या कार्यकर्त्यांचा राडा; शाई फेकण्याचा प्रयत्न
जमाव बंदीचा आदेश जुगारून सतेज पाटील व अमल महाडिक यांच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केली होती. . यावेळी दोन्ही गट आमने – समाने आल्याचे समजताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले आहे. मात्र या प्रकारामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
मोठी बातमी: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार, राजेश टोपेंची माहिती
विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण मयत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महाविकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.
Read Also :
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार
- देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
- मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?
- महाविकास आघाडी सरकारला पाटलाच्या नाही तर खानाच्या पोराची चिंता; नितेश राणेंची सडकून टीका