मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी राहुल गांधी यांनी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर गैरवर्तन आणि अपमान केल्याचा आरोप केला. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर जातीवाचक टिप्पणी केली. ज्यांच्या स्वत: च्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेबद्दल बोत आहेत. नंतर अनुराग ठाकूर यांनी मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं. परंतु यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनुराग ठाकूर आणि भाजपच्या विरोधात आज संपुर्ण राज्यात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलीत. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
हेही वाचा..“तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात”, इतना डर होना भी चाहिए..!
लोकसभेच्या सभागृहात जातनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याची जात विचारून देशातील समस्त बहुजनांचा अवमान करणाऱ्या. देशात चातुर्वण्य व्यवस्था आणू पाहणाऱ्या मनुवादी वृत्तीच्या विरोधात धुळ्यात जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर आणि शहर अध्यक्ष डॉ. अनिल भामरे तर नाशकात नाशिक शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या उपस्थित निदर्शने केलीत.
हेही वाचा…यंदा माधुरीताईंचं तिकीट कापणार? श्रीनाथ भीमाले भाजपकडून स्ट्रॉंग उमेदवार.!
दरम्यान, सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटीबद्ध आहेत. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्याचे रणशिंग फुंकले असून भाजपाने कितीही विरोध केला तरी देशात जातनिहाय जनगणना होणारच. अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा..“देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व गुण, ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत तर आनंदच..”
हेही वाचा..महायुतीत बिनसलं..! नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध
हेही वाचा..विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!
हेही वाचा..विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला धाडलं पत्र