पुणे : महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पहिल्यापासून इच्छुक असलेले राहुल कलाटे महाविकास आघाडीवर नाराज असल्याचं समजत आहे. त्यानंतर या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज सादर करणार असं राहुल कलाटे यांनी म्हटलं. त्यानंतर यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने आमदार सुनील शेळके पाठवले. तसेच ते विचारपुर्वक करून निर्णय घेतील, असं शेळकेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल कलाटे नाराज असल्याचं समजलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राहुल कलाटे आमच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये आघाडीचा उमेदवार विजयी करू. असं सुनिल शेळके यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “
दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सलग तीन वेळा लक्ष्मण जगताप चिंचवडमधून निवडून आले आहेत. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांनी फक्त 7841 मतांनी शिवसेनेचे सध्याचे खासदार अप्पा श्रीरंग बारणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 साली सलग दोन वेळा भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवून आमदार झाले होते. यातच त्यांनी अलिकडच्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी आजारी असतांनाही विधानभवनात येऊन मतदान केले होते. त्यामुळे सहाजिकच या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे.
हेही वाचा..कसब्यात आता हिंदू महासभाही मैदानात, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
यातच 2014 ते 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांना राहुल कलाटे यांनी दोन्ही निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. 2014 च्या विधानसभेत राहुल कलाट्यांना शिवसेनेने तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांना 63, 489 मत पडली होती. त्यानंतर मात्र राहुल कलाट्यांचा जनमत मोठ्या प्रमाणात तयार झाला. 2019 च्या विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती झाल्याने राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडूक लढविली. त्यांना यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यात त्यांना 1,12,225 मतं तर लक्ष्मण जगताप यांना 1,50,723 मत पडली होती. यातच राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप अशीच लढत चिंचवडमध्ये आतापर्यंत बघायला मिळत आली आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांच्या खालोखाल राहुल कलाटे यांचाच नंबर चिंचवडमध्ये लागतोय. यावेळी त्यांनीही अर्ज सादर केला आहे. त्यामुळे मतदारांचा कल त्यांच्याकडे अधिक असल्याचं दिसून येत आहे.
Read also
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?
- हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”