नाशिक – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे पण, त्यांचे आपसातले संबंध फार सुरळीत नाहीत. पत्रपरिषदेत मनसेचे राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला, महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी होणार का? यावर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील बेभरवशाच्या संबंधांवर टोमणा मारताना राज ठाकरे म्हणालेत ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’
सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला; शब्दकोशातील ‘त्या’ शब्दाचा अर्थ दाखवला..
महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय? ते मला काय माहीत, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचे उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांना हा प्रश्न का विचारला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ? ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?” हे राज ठाकरे यांचे उत्तर एकून सर्व हसायला लागलेत.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही आपली भूमिका मांडली. राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
गृहमंत्री वळसे पाटलांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडली; 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
“एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची ती आहे असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटनांना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.
Read Also :
- रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
- ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..
- मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’, औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी!
- नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका..
- लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक