पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या दोन अंकी करण्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्यापासून (बुधवार) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती येणार आहेत. या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचा पंधरा दिवसाच्या आत हा दुसरा तीन दिवसाचा दौरा आहे.
मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर
मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. किशोर शिंदे, गणेश सातपुते, रूपाली पाटील यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात तीन दिवस मुक्काम करून सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख आदींशी चर्चा केली. तसेच पुढच्या १५ दिवसात पुन्हा पुण्यात तीन दिवस बैठका घेणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार २८ ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्चीत करण्यात आला आहे. यामध्ये शाखा अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे.
राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी; मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन
बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कसबा, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या व शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत, असे मोरे यांनी सांगितले. राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर असले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी केवळ एक तासाचा वेळ देण्यात आला आहे. या एका तासा मध्ये तीन चार पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या मुलाखतींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुपारी १२ वाजता मुलाखती संपल्यानंतर राज ठाकरे यांचे कोणते कार्यक्रम असणार आहेत अद्याप निश्चीत झालेले नाही, असेही पत्रकार परिषदेत सांगितले.
Read Also :
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर