मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पुणे आणि नाशिक जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकविण्याचे त्यांचे स्वप्न असून, पुणे महापालिकेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने ते या दोन्ही जिल्ह्यांत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज ठाकरे, येत्या २१ ते २३ सप्टेंबरच्या दरम्यान नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत.
चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची मोठी घोषणा केल्यांनतर, त्या दृष्टीने पक्षाच्या पुढच्या योजना आखण्यासाठी ते दौऱ्यावर जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, कार्यकर्त्यांना बळ देण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे, राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्याने येती महापालिका निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला वाढता विरोध, मनसेही मैदानात
दुसरीकडे, नाशिक मनसेत गटबाजी जुनीच आहे. त्यामुळे, अनेकांनी बुडत्या बोटीची साथ सोडून दुसऱ्यमध्ये उड्या घेतल्या. त्याच्या कारणांबद्दलही अनेकांनी जाहीररीत्या बोलून दाखवले. पक्षाचे कार्यक्रम, बैठका, पक्षश्रेष्ठींचे आदेश, आंदोलने एकमेकांना विश्वासात न घेताच त्यांचे नियोजन केले जाते असे देखील सांगितले गेले. या सगळ्यामुळे अखेरीस राज ठाकरे यांनी स्वतःच नाशिकमध्ये लक्ष घालण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी ३-४ वेळा नाशिकचा दौरा करून पक्षाची घडी बसवली.
शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
दरम्यान, राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी बुधवारी राजगडावर एक बैठक झाल्याचे समजत असून, या बैठकीला नाशिकमधून माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी हजेरी लावली होती. राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये १८ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.
Read Also :
- भाजप नगरसेवकांने केला महिलेचा विनयभंग? किरीट सोमय्या म्हणतात, चौकशी झाली पाहिजे
- ‘राजकारणात कुणाला कुठल्या चेंडूवर बोल्ड करायचे, हे क्रिकेटमुळे चांगले माहिती!’
- सोशल मीडियावर अॅक्टिव्ह व्हा, दिवसातून किमान एक तरी पोस्ट शेअर करा – राष्ट्रवादीचे आवाहन
- चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
- मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, संभाजीराजे कडाडले…