मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्याच्या दिनानिमित्ताने झालेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार टिका केली. यावेळी त्यांनी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत त्यांनी एक सभेतच व्हिडीओ दाखवला. तसेच हे बांधकाम एका महिन्यात हटवा, नाहीतर त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारू असा इशारा दिला. त्यानंतर लगेचच पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेत.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
शिवतीर्थावर झालेल्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा विविध मुद्यांवरून चांगलीच चर्चेत आली.माहीम येथील मगदूम बाबा दर्ग्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी सभेत उपस्थित केला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या सभेत म्हटलं की, माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबई पोलीस आयुक्त ह्यांना विनंती आहे की, माहिमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात मुस्लिम धर्मीयांनी जे काही अनधिकृत बांधकाम केलं आहे. ते तोडा नाहीतर तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. मग जे व्हायचं ते होऊ दे. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आज मुंबई महानगर पालिकेने माहिम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकला आहे.
हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात अनधिकृत बांधकाम केलं गेलं आहे. २ वर्षापुर्वीचे सॅटेलाईच फोटो पाहिलेत तर तिथे काहीच नव्हतं. आता तिथे नवीन हाजीअली तयार करणं सुरू आहे. दिवसाढवळ्या हे सुरू आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही. ? असा सवाहीही राज ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
राज ठाकरे यांनी सांगलीतील मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले की, ” सांगलीत कुपवाड येथे काही धर्मांध मुस्लिमांनी हिंदूंच्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे आणि त्याठिकाणी अनधिकृत मस्जिद बांधली जात आहे. हिंदूंनी विरोध केला तर त्यांना मुस्लिम झुंडी त्रास देतात. सरकारने अशा घटनांवर चाप लावावा अन्यथा आम्ही आहोतच. असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
Read also
- हेही वाचा…“..तर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही”, राज ठाकरेंचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया