IMPIMP

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

राज्यात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोघांनीही सकारात्मक संकेत दिल्यानंतर, राजकीय वर्तुळात ही चर्चा अधिकच गाजू लागली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची तयारी दर्शवली. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील मुद्द्यांपेक्षा आमच्यातील वाद खूप छोटे आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे दोघं भाऊ एकत्र येण्याच्या शक्यतेवर अधिक चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांना या चर्चांबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी थेट उत्तर दिलं – “हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. याची माहिती माझ्याकडे नाही. मी काही त्यांच्याशी बोललो नाही. आणि त्यावर कसं मी भाष्य करू?”

दरम्यान, पवार कुटुंबामध्येही एकोपा वाढताना दिसत असल्याचे काही पत्रकारांनी सूचित केल्यावर शरद पवार म्हणाले, “जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. उदाहरणार्थ, उसाच्या उत्पादनवाढीच्या मुद्द्यावर आम्ही बसून चर्चा केली. काम करणं आवश्यक आहे, पण त्यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून सरकारच्या प्रतिनिधींशी बोलण्यात काहीही चुकीचं नाही.”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

 

Total
0
Shares
Previous Article

भाचीला न्याय द्या, पीडित आईच्या व्हायरल पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा फोन, निलम गोऱ्हेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

Next Article

शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत करा – नाना पटोले यांची मागणी

Related Posts
Total
0
Share