मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्षांचे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्याने या मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. काही अपरिहार्य कारणामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले आहे.
संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या
मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.२३/१०/२०२१ रोजी मुंबईत, तर दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2021
उद्या 23 ऑक्टोबर रोजी भांडूप येथे हा मेळावा होणार होता. या मेळावाच्या आयोजनाबाबत काल मनसे मुख्यालय राजगड येथे बैठक फार पडली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली होती. या मेळाव्यातून राज ठाकरे मुंबईत मुंबई महापालिका आणि पुण्यात पुणे महापालिकेचं रणशिंग फुंकणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे मनसेच्या या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
Read Also :
- मोठा धक्का: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद
- ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है; नांदेडमधील सभेत छगन भुजबळांचा शायराणा अंदाज
- मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा – राधाकृष्ण विखे पाटील
- आम्हाला अडकवण्यासाठी भाजपची ८ महिन्यांपुर्वी बैठक झाली होती; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
- शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार; राजू शेट्टींचा इशारा