मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्या उपस्थित करत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शविला. त्यानंतर राज ठाकरे यांच्य आव्हांना राज्यातील काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरावर मोठ्या प्रमाणात आवाज देऊन हनुमान चालिसा वाजवण्यात आली. मात्र पुण्यात याचा उलट परिणाम बघायला मिळाला. राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. तर अशातच आता पुण्यात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्य़ावरून मनसे पुणे शहरात खळखट्यात करणार असल्याचं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगितलं आहे. तर अशातच पुण्यात राज ठाकरे यांच्या नावाला मुस्लिम कार्यकर्त्यांना काळं फासलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश
पुण्यातील कोंढवा येथील नुरानी कब्रस्थानचे भूमिपुजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबाबत फलक देखील त्याठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र राज ठाकरे यांचं मशिदीवरील भोंग्याला विरोध आणि राज्यातील वातावरण पाहता आज त्या फलकावरील राज ठाकरे यांच्या नावाला लोकांनी काळा रंग लावून निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मनसे वाद आणखीनच चिघण्याची शक्यता आहे.
आयएनएस विक्रांत प्रकरण! किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान
पुण्यात मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेत वसंत मोरे आणि हेमंत संभूस असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी जोर धरू लागल्या आहेत. पुण्यातील डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसे पोलिस ठाण्यात पत्र दिले आहेत. त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशन ला याबाबत पत्र दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना भोंगे काढण्य़ाचा 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर भोंगे काढले नाहीतर त्याच्या दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचं हेमंत संभुस यांनी म्हटलं आहे.
आयएनएस विक्रांतचा ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? सोमय्यांकडे बोट दाखवत राऊतांचा सवाल
आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायची इच्छा नाही. अथवा प्रार्थनेला विरोध नाही. तरी अनधिकृत भोंग्यामुळे सर्व सामान्य नागरीक वृद्ध व विद्यार्थी यांना होणार त्रास मनसे खपवून घेणार नाही. त्यामुळे शहरातील अनधिकृत भोंगे काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची तसेच पोलीस प्रशासनाची आहे. तसे न झाल्यास मशिदीसमोर दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठन केले जाईल, असं पत्र मनसेतर्फे पोलिसांना देण्यात आलं आहे.
Read also:
- काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- 4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?
- इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका
- दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
- गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी