पिंपरी चिंचवड : आगामी महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे, नालेसफाई, रस्त्यांचे डांबरीकरण, कचरा यांसारख्या छोट्या मोठ्या विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी २०२२ ला शिवसेनेचाच महापौर बनवणार असल्याचे गर्जना केली. त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ली असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची झोप उडली. परंतू स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीला मनावी तशी साथ मिळत नसल्याने अजित पवार यांनी थेट आयुक्तस्ट्रोकच लावला असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. कारण महापालिका आयुक्त राजेश पाटली यांनी जनतेच्या कामामध्ये लक्ष घालण्याची गरज असताना केवळ भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना कुण्या ना कुण्या कारणावरून अडचणीत पकडण्याचे शस्त्र हाती घेतले आहे.
‘कर्जत-जामखेडमध्ये फिल्डिंग करणारेही पाहिले अन् मॅच फिक्सिंग करणारेही; रोहित पवारांची फटाकेबाजी
एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. पिंपरी चिचंवडच्या विकासकामांमध्ये राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. परंतू, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता खेचून आणल्यामुळे राष्ट्रवादीचा अवघा बुरूंज ढासळला. गेली पंधरा वर्ष विकासकामांसाठी धडपडलेली राष्ट्रवादी अचानक तोंडघशी पडल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनेक दिवस शहरात फिरकले सुद्धा नाही. दरम्यान, राष्ट्रवादीला पराभव पचवेना झाला, अशी चर्चा रंगल्याचे चित्र होते. परंतू, एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून जगभर ओळख आहे. त्यामुळे, बडे-बडे व्यावसायिक येथे गुंतवणुकीसाठी इच्छुक असतात. यामध्ये गावकी- भावकीचेही योगदान निश्चित जास्त आहे. त्यामुळे, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या दृष्टीने पाऊल टाकत असतानाच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेमधील एक असलेल्या महापालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमधील राजकारनी केवळ पैसे कमवण्याची मशीन बनवू पाहत आहेत, हे दुर्दैवी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले नेते आपल्याच मर्जितील आयुक्तांची नियुक्ती करत असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यातील होर्डींग युद्ध सुरूच; भाजप- राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेची चमकोगिरी
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आहे. परंतू, राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ मिळाली. मात्र, सत्ता स्थापनेनंतर राज्यात कोरोना, महापूर, निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-२, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा अनेक संकटांचा समाना करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडमध्ये इच्छा असूनही फारसे लक्ष देता आले नाही. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीत बालेकिल्ला पुन्हा हस्तगत करण्यासाठी अजित पवारांनी आपल्या मर्जीतील असलेले आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत भाजपच्या आमदारसह सताधाऱ्याच्या मुसक्या आवळण्यासाठी कट रचला असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नेते नको नकोशे
पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्राचे ‘कारभारी’ असलेले उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस (२२ जुलै) अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. शहर राष्ट्रवादीने प्रचंड फ्लेक्सबाजीसह सामाजिक उपक्रमांचाही धडाका लावला. परंतू, शहरातील फ्लेक्सवर माजी आमदार विलास लांडे यांचा फोटो वगळण्यात आला. विलास लांडे यांची ‘पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील शरद पवार’ अशी ओळख आहे. अत्यंत मुत्सद्दी असलेल्या लांडे यांनी भोसरी मतदार संघातून १० वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. परंतू, फ्लेक्सबाजीवरू वगळण्यात आल्याने अजित पवारांना स्थानिक नेते नको-नकोशे झाले आहेत का?, फक्त आयुक्तांच्या मदतीनेच भाजपशी कुरघोडी खेळायची?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आयुक्त साहेब हे वागणे बरे नव्हे…
महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहरातील रिक्षाचालक, हातगाडी, पथारी, टपरीधारक, भाजी विक्रेते, मोलकरणी, बांधकाम मजूरांची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन काळात मदत म्हणून ३००० रुपये प्रति कुटुंब देण्याचा निर्णय केला. अत्यंत स्वागतार्ह निर्णय होता, पण कायद्यात तरतूद नसल्याचे कारण देत महापालिका आयुक्तांनी ही मदत नाकारली.
महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज
दरम्यान, स्मार्ट सिटीमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार सुरु आहे. नियम अटी, कायदे कानून सगळे दिवसा ढवळ्या पायदळी तुडवले जात आहे. परंतु तिथे आयुक्त कायद्यावर का बोट ठेवत नाहीत? बरं महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कामगारांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी एका भाजपा आमदारांच्या निकटवर्ती व्यक्तीच्या कंपनीवर कारवाई केली, अशी चर्चा आहे. अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, यापैकी काहीलोक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकाचे नातेवाईक आणि कार्यकर्ते असल्याचे बोलले जाते. मग, केवळ गोरगरीब मागासवर्गीय समाजाला मदत देताना कायद्याचा चुकीचा अर्थ कडून खोडा घालता येता का? खर्च आपण जर इतके कायदे प्रिय असाल तर मोठ्या धेंडानवर कायद्याचा बडगा उगारून दाखवा ना?. तिथे मात्र प्रशासन का शेपूट घालते? हे केवळ वरून येणाऱ्या आदेशाला थारा देण्यासाठी सत्ताधारी भाजपला अडगळीत पकडण्यासाठी चालले आहे का? की जनतेच्या पश्नापेक्षा आयुक्तांना राष्ट्रवादीचे पुनर्वसन महत्वाचे आहे? असे अनेक प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना पडले आहेत.
Read Also :
- सातव कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण, राहुल गांधींची भेट घेऊन केला आनंद द्विगुणित
- फडणवीसांचे भास्कर जाधवांना शालीतून जोडे, तर महाविकास सरकारला मोलाचा सल्ला
- राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार
- खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
- “चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन