कल्याण : कल्याणमध्ये २७ गावातील अमृत पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी स्वतः पुरवठा केल्याचे सांगितले होते. त्यावर शिवसेना नगरसेवक दीपक म्हात्रे यांनी या कामासाठी शिवसेना नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे असं म्हटलं होतं. कोणत्याही कामात श्रेय घेण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदाराची पीएचडी झाली आहे असा टोला देखील त्यांनी राजू पाटील यांना मारला होता. त्यावर आता आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
“एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या”
विकास कामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांनी माझ्या विरोधात बोलायची लायकी तरी आहे का ? हे एकदा पाहावे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला असं मी कुठंही म्हटलेलो नाही. म्हात्रे यांनी स्वतः मालक व्हावे. बाउन्सर बनून नुसतं फिरू नये असा सल्ला देखील राजू पाटील यांनी दिला आहे. ठाण्याचे तुमचे मालक जेव्हढं सांगतात तितकचं बोलत जा असा सल्ला देखील राजू पाटील यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जावई शोध
विभा कंपनीच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी खासदार आणि आयुक्तांनी केली केली. त्यावर आमदार पाटील यांनी म्हटले आहे की कोरोना हा पहिले एक आजार होता. आत्ता त्याचा बाजार झाला आहे. नवे रुग्णालय होत आहे. हे नक्कीच रुग्णांच्या फायद्यासाठी आहे. चांगल्या कामासाठी आमचा कायम पाठिंबा आणि सहकार्य राहिले आहे. मात्र कोविड सेंटर आणि रुग्णालयाचे ऑडीट होणो देखील गरजचेआहे. मागच्या वेळी जसे घोळ झाले. तसेआत्ता व्हायला नको. त्यावर आमचे आत्ता लक्ष राहिल याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
Read also:
- कोल्हापुरात सत्तारूढ गटातील ज्या नेत्यांमुळे पराभव झाला त्यांना किंमत चुकवावीच लागणार; विनय कोरेंचा इशारा
- पंतप्रधानांविषयी कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेपाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा – चंद्रकांत पाटील
- धनंजय मुंडेविरोधात कोणतीही निवडणूक लढवणार नाही; करुणा मुंडेचा ‘त्या’ वक्तव्यांवरून यु-टर्न
- संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे – चित्रा वाघ
- ‘डान्सिंग डॉल’ची उपमा देणं पडलं महागात; अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा