फेमस डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. परंतु त्यांनी खूप अनोख्या अंदाजात आपलं मत मांडलं आहे.
SARKAAAR am sure u will kick Corona on its butt and come back more stronger than ever like u always did ..I wont pray for u, but I will pray for the Corona who will surely die in its assault on u🙏🙏🙏 https://t.co/AmGcJSBgpA
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) July 12, 2020
राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलं की, ‘सरकार मला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही कोरोनाला लाथ मारून मजबूतीनं पुन्हा वापसी कराल, जसं की तुम्ही कायमच राहता. मी तुमच्यासाठी प्रार्थना नाही करणार, परंतु मी कोरोनासाठी प्रार्थना करेन जो तुमच्यावर केलेल्या हल्ल्यात नक्कीच मारला जाईल.’
राम गोपाल वर्मा आणि अमिताभ बच्चन यांनी सरकार, आग आणि सरकार 3 अशा काही सिनेमा सोबत काम केलं आहे.
अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.