मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या, “केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी,” या मागणीवर टीका करताना, “राज्य सरकारने काही झालं की ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर केंद्राने करायच्या असतील तर, राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, अशी टीका केली होती.
याला उत्तरादाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, “फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!”, असा जोरदार हल्लाबोल केला होता.
दरम्यान, यात आता भाजप आमदार राम सातपुते यांनीही उडी घेतली असून ट्विट करत त्यांनी, “आम्ही समजू शकतो मलिकजी आपण मंत्री असतानाही आपला जावई ड्रग केसमध्ये तुरुंगात आहे, त्यात आपण रोज घरी गेलात की; बायका-पोरं भांडत असतील आणि म्हणत असतील जावयाला बाहेर काढू शकत नाही, असो.. आपली अवस्था मी समजू शकतो. मला तर वाटतं आपण मनोरूग्ण झाला आहात, सांभाळा स्वतःला”, असा जोरदार घणाघात त्यांनी मलिक यांच्यावर केला आहे.
आम्ही समजू शकतो मलिकजी आपण मंत्री असताना आपला जावई ड्रग केस मध्ये तुरुंगात आहे ,आपण रोज घरी गेलात की बायका पोर भांडत असतील आणि म्हणत असतील जावयाला बाहेर काढू शकत नाही.. असो आपली अवस्था आम्ही समजू शकतो .मला तर वाटत आपण मनोरुग्ण झाला आहात.
सांभाळा स्वतःला ..
@nawabmalikncp https://t.co/ddunvUNCua— Ram Satpute (@RamVSatpute) May 15, 2021
सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगेलच तापलेले असून, यावरून सत्ताधारीर आणि विरोधकांमध्ये चांगलीच ‘तू-तू-मैं-मैं’ सुरु असल्याचं पाह्यला मिळत आहे.
Read Also :
- देशात रुग्णसंख्या तीन लाखांच्या खाली, मृतांची संख्या चिंता वाढवणारी
- देश सोडून पळाल्याच्या अफवांवर सायरस पुनावाला म्हणाले…
- … अन्यथा मी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करेल, पडळकरांचे अजित पवारांना पत्र
- काँग्रेस नेत्यांनी ट्विटर प्रोफाइल बदलत पंतप्रधान मोदींना केला ‘हा’ सवाल
- ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’