मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केला, अन् त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसला. अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे यांना अनेक संघटना पाठिंबा देत आहेत.
पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आपल्या पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण केले आहे. गायकवाड यांनी यापुर्वी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव व प्रवक्ते म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी युनायटेड रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून नगर जिल्ह्यात संघटन केले होते.
अशोकराव गायकवाड यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे, नंदकुमार मोरे, शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, पाथर्डी तालुकाप्रमुख भगवान आदि उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना आता नवी रणनीती आखताना दिसत आहे.
“तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
दरम्यान, अलिकडेच आंबेकरी चळवळीच्या प्रवक्त्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडने देखील शिवसेनेसोबत युती केली असून आगामी निवडणुका ते सोबत लढणार आहेत. तसेच अशा अनेक संघटनांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
Read also
- “टपरीवर काम केलं नाही, पण मी कुणाला चुना लावला नाही”; गुलाबराव पाटलांच्या टिकेला खडसेंचं उत्तर म्हणाले,,,:
- “जर निर्मला सीतारामण यांना वेळ असेल, तर मी स्वत: फिरून त्यांना बारामती दाखवेन;” सुप्रिया सुळे
- “महाराष्ट्रातील जनता कोणाबरोबर आहे? हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल”; शंभुराज देसाई
- “तर आम्ही उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू”; खासदार राहुल शेवाळे यांचं वक्तव्य
- “आम्ही ५० जण बाजीगर होतो, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका”; शहाजी पाटिल