IMPIMP

ठाकरे बंधूंच्या ‘विजयी मेळाव्या’वर रामदास कदमांचा हल्लाबोल: “हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी केली, आता कशाचा जल्लोष?”

मुंबई: येत्या ५ जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईत होणाऱ्या संयुक्त ‘विजयी मेळाव्या’ची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या मेळाव्यावर आणि ठाकरे बंधूंच्या एकजुटीवरच जोरदार टीका केली आहे. कदम यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे.

हेही वाचा…मनसेच्या ‘मराठी’ दणक्यावर: राणे-देशपांडे आमनेसामने!

“हिंदी सक्तीचा जल्लोष कसला? ती तर उद्धव ठाकरेंनीच केली!”
रामदास कदम यांनी ठाकरे बंधूंना थेट सवाल केला, “हिंदी सक्तीच्या विरोधात विजय जल्लोष कसला साजरा करताय? हिंदी सक्ती तर उद्धव ठाकरे यांनीच केली, “असा गंभीर आरोप त्यांनी केला. मराठी माणसाच्या मुद्द्यावरूनही कदमांचा निशाणा कदम यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरूनही ठाकरे गटाला घेरले. ते म्हणाले, “मुंबईतील सोसायट्यांमध्ये जेव्हा मराठी माणसांना मांस खाण्यास मनाई केली जाते, तेव्हा हे लोक कुठे जातात?” मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे त्यांचे सरकार होते, तरी त्यांनी मराठी माणसांसाठी काय केले, असा सवाल त्यांनी विचारला. “मराठी माणूस गिरगाव, दादर येथून अंबरनाथ-कल्याण येथे गेला. आता मुंबईत मराठी माणूस फक्त १७ टक्के उरला आहे. जेव्हा दोन जिल्ह्यांची, पुणे आणि नाशिकची मागणी केली होती, तेव्हा नाही जमले, आता का वाटी घेऊन हात पसरवतात?” असा सणसणीत टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

हेही वाचा…मुंबईत ‘ठाकरे’ एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, ‘बूट चाटण्या’चा टोला!

 

“उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही, तुमचा कसा होणार?” – राज ठाकरेंना सल्ला
रामदास कदम यांनी राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला दिला. “उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे. त्याचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे. राज ठाकरेंनी जरा समजून जपून पुढचा विचार करा,” असे कदम म्हणाले. त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे वापरून घेतील, असे सुचवत म्हटले की, “उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही, तुमचा कसा होणार?”

 

हेही वाचा…राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे भाजपमध्ये दाखल; नड्डांच्या निमंत्रणामुळे चर्चांना पूर्णविराम!

“शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं, पळ मेल्यानंतर वावळतोय!”
कदम यांनी उद्धव ठाकरेंवर शिवसेनेला संपवल्याचा आरोप केला. “मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, तर उद्धव ठाकरे पुन्हा काँग्रेसकडेच जातील. मनोहर जोशी यांना लाखो लोकांसमोर मंचावरून खाली पाठवले, रावतेंना काहीच दिले नाही. शेवटी, शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे कोणाचा भाऊ होऊ शकत नाही. पळ मेल्यानंतर शेवटी वावळतोय,” अशा बोचऱ्या शब्दांत कदम यांनी टीका केली. रामदास कदम यांच्या या विधानांमुळे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

हेही वाचा…

पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”

ठाकरे पिता-पुत्राला सरनाईकांचे जेवणाचे निमंत्रण: शिंदे गटात चर्चांना उधाण!

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राणेंचा निशाणा: ‘स्वार्थासाठीची धडपड!

हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस :आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी!

चित्रा वाघ संतापल्या, आरोपीला अटक करा! पुण्यात कुरिअर बॉयच्या वेशात येऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

 

Total
0
Shares
Leave a Reply
Previous Article

पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: "एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!"

Next Article

नाशिक जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा कृषिमंत्र्यांना घेराव: "ओसाड गावच्या पाटीलकी" विधानावरून बाचाबाची!

Related Posts
Total
0
Share