पुणे : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेषठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री पुण्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चव्हाण यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी सोपवल्याची चर्चा त्यावरून काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
लष्कर भागातील पक्षाच्या एका जुन्या पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याचे समजते. पक्षाच्या स्थितीविषयी चव्हाण यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. निष्क्रिय पदाधिकारीच याला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. अशीच स्थिती राहिली तर पक्ष शहरातून अस्तित्वहिन होईल, त्यानंतर तुमचेही काही महत्व राहणार नाही असे चव्हाण यांनी सुनावले असल्याचे समजते.
उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न
शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, पालिकेतील गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे आदी बैठकीला उपस्थित होते.
मनसेचे मिशन २०२२: राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठका
महापालिकेत यश मिळवायचे असेल तर आतापासूनच त्याची तयारी करायला हवी, अशी सूचना त्यांनी केली. पक्षाचा तळागाळातील पाया ढिला झाला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जनसंपर्क तुटला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन काम करायला लागा असे चव्हाण यांनी सांगितले. उपनगरांसाठी त्वरीत तेथील कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या, समिती स्थापन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करा त्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांवर काम करा असे चव्हाण यांनी सांगितल्याचे समजते.
Read Also :
- अन् मला ती वारी पुन्हा पाहायची आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
- …तेव्हाच मी ईडीसमोर येईन…गायब आणि नॉट रिचेबल असलेल्या देशमुखांनी केला मोठा खुलासा
- योगायोग की…? फडणवीस आणि अजित पवारांनी दिला वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हा एकच संदेश
- काँग्रेसने परत छेडले शिवसेनेला? पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली की स्तुती?