दिल्ली : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसमध्ये सामील होण्याची जाहीर ऑफर दिली होती. ‘पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं,’ असं ते म्हणाले होते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा संदर्भ देत खिल्ली उडवली असून, ‘काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते. म्हणूनच पवारांनी माडीला टेकू दिला,’ असा जोरदार खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
‘बाळासाहेब थोरातांची भूमिका योग्यच, राष्ट्रवादीने काँगेसमध्ये विलीन व्हावं!’
‘शरद पवार कित्येक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस येत असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी माडी सोडली आणि राष्ट्रवादीच्या रुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिला आहे. हे करून त्यांनी, तुमची माडी कधीही कोसळू शकते हेच दाखवून दिलं आहे,’ असा टोमणा मारत त्यांनी, ‘थोरातांची ऑफर हस्यास्पद असून, पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळेल,’ अशीही टीका केली.
शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचे खुले आवाहन
दुसरीकडे, थोरातांच्या वक्तव्याचं समर्थन करताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, ‘सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर काँग्रेसच्याच विचारधारेतून वेगळा झालेला पक्ष आहे. त्यामुळे मतभेद आणि टोकाची भूमिका ठेऊन, एकमेकांना दुखावण्यापेक्षा त्यांनी एकत्रं आलेलं कधीही चांगलं. आपण एकाच विचारधारेचे आहोत. त्यामुळे, बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये घेऊन यावं आणि शक्ती वाढवावी,’ असं म्हटलं आहे.
मोठी बातमी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे ५ ऑक्टोंबरला मतदान, निवडणुक आयोगाची घोषणा
या सगळ्यामुळे, आता महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सगळं वाद वर येत असल्याने याचा पक्षाच्या राजकीय समीकरणांवर देखील काय परिणाम हतो याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांत प्रत्येक पक्ष हा स्वबळावरच लढणार असल्याची चिन्हे अजूनही दिसत असून, ऐनवेळी मात्र कुणाची कुणाशी युती आणि आघाडी होईल, हे सांगता येणे अशक्य आहे.
Read Also :
- पिंपरी चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप; भाजपचे बडे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार
- शिवसेनेच्या “मुका” नंतर आता भाजपचा “मुका” वादाच्या भोवऱ्यात.!
- करुणा शर्मा यांची न्यायालयात सुनावणी, आज होणार फैसला सुटणार की अडकणार?
- मृत्यू दाखल्याची कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन; सत्तारांनी ग्रामसेवकाला भरला दम
- प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर