मुंबई : आयपीएस बदल्यांच्या कथित रॅकेट प्रकरणाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात, बीकेसीमधील सायबर पोलिसांनी २६ मार्चला ऑफिशियल सिक्रेट ॲक्टअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल केला होता, तसेच या गुन्ह्याप्रकरणी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्यास सांगितले होते.
मात्र, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर महासंचालक रश्मी शुक्ला यांनी महामारीचे कारण सांगत असमर्थता दर्शविली होती. तसेच माझ्याकडे चौकशी करायच्या संबंधित प्रश्नावली पाठवावी, असे त्यांनी तपास अधिकाऱ्यांना कळविले होते. यानंतर परत ३ मे रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स मुंबई पोलिसांनी बजावले. मात्र, त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला असून, मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांच्या तुकडीने, हैदराबादमधील त्यांच्या घरी जाऊन शुक्लांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे. या जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये केलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले असल्याची देखील माहिती मिळत आहे. यात आता पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांची तुकडी इतर तांत्रिक पुरावे गोळा करत आहे.
Read Also :
- Big Breaking : दहावीच्या परिक्षांविषयी राज्य सरकार जीआर काढणार
- ‘मोहन भागवतांनी मौनव्रत सोडावे; राम मंदिराइतकाच, गंगेतील प्रेतांचा मुद्दा महत्वाचा’
- शिवसेनेचा नेता देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी तडफडत होता; उदय सामंत म्हणतात….
- उजनी पाणी प्रश्न : ‘५ टीएमसी पाण्यासाठी आता पुढचे आंदोलन थेट गोविंदबागेत’
- ‘…तर आम्ही पेढे वाटपाचा कार्यक्रम करू’, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला