हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या टप्प्यात, विदर्भाची संवाद यात्रा काढली होती. त्यात एकूण ८२ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला होता. त्यात विदर्भातील ११, तर जिल्ह्यातील ६२ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला, तर खान्देशातल्या 20 मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, आज हिंगोलीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.
“अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
यावेळी, राज्यात शासनाने लागू केलेल्या महामारी नियमांचा मान राखत, राष्ट्रवादीकडून ही परिवार संवाद (दौरा) यात्रा थांबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या दौर्याचा दुसरा टप्पा, तुळजापूरमधून आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन २४ जूनपासून सुरू करण्यात आला. त्यात, यवतमाळ मधील उमरखेड हा एक मतदारसंघ होता आणि पुढच्या २२ मतदारसंघात, (उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली) आढावा घेतला. आता महामारीचा फैलाव कमी होईल, त्यावेळी परभणी जिल्हयातून ही यात्रा पुन्हा सुरू करु,” असे पाटीलंनी स्पष्ट केले.
आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
“विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातही या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या स्थापन करण्याचे व संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. जातीयवादी शक्तींना सत्ता केंद्रापासून दूर ठेवण्यासाठी, अधिक प्रमाणात पुरोगामी विचारांचा प्रसार करायला हवा, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करायला हवे,” अश्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.
Read Also :
- “मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्रंही पाठवले, तरी उत्तर आले नाही”, राजू शेट्टींची शरद पवारांकडे तक्रार
- सार्वजनिक गणेशमुर्ती ४ फुटाची तर घरातील बाप्पा २ फुटाचा; यंदाही मुर्तीकारावर कोरोनाचे सावट
- शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये घडले नाराजी नाट्य, वाचा सविस्तर
- “वडेट्टीवार फन्टूस औलाद, त्यांनी आमच्या जिल्ह्यात येऊन दाखवावं”; भाजप आमदाराचे जाहीर सभेत आव्हान
- तीन पक्ष आपापसात भांडतायंत का? हो तीन पक्ष भांडतायंत अन् जनतेला त्रास देतायं