पुणे : देशात सातत्याने वाढत असलेल्या गॅस सिलेंडरच्या आणि इंधनाच्या दरामुळे सामान्य जनता होरपळून गेली असून, त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज महागाई विरोधात जोरदार राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी, महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पाठवल्या आहेत.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक
या आंदोलनाची सुरुवात पुण्यातून सिटी पोस्टाबाहेर हे आंदोलन सुरू करून करण्यात आली. यावेळी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या. “अच्छे दिनचे खोटे स्वप्नं दाखवून, सामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला महागाईचे ‘प्रतिक’ म्हणून, राज्यातल्या बहिणींनी शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत,” असं त्या यावेळी म्हणाल्या. मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या भावात तब्ब्ल २५ रुपयांनी वाढ केली आहे.
परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
“महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी ‘उज्वला गॅस योजना’ आणली. पण त्याने पोट भरत नाही. दर १५ दिवसांनी स्वयंपाकाच्या गॅस-सिलेंडरचा दर वाढतोय. त्यामुळे योजनेचा मूळ हेतूच नष्ट झाला असून, महिलांना ‘चुलीकडे चला’ म्हणण्याची वेळ आली आहे. महामारीमुळे सर्वसामान्य माणूस सर्वांगाने हवालदिल झाला असताना, दरवाढ करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. त्यामुळे, बहिणी विचारत आहेत, “क्या हुआ आपका वादा, महंगाईसे घर बेचना पडा आधा,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
Read Also :
- खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
- अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
- १२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
- तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?
- “भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान