७,४९९ किंमत असणारा Realme C11 हा फोन आता विक्रीसाठी मार्केटमध्ये आला आहे. फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाची अधिकृत वेबसाईटवरून आज दुपारी १२ वाजता Realme C11 हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. इतक्या कमी किमतीत एवढे जबरदस्त फीचर्स देणारा हा लेटेस्ट फोन मार्केटमध्ये खूप चालणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फ्लिपकार्ट Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट दिली जाणार आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय ची सुविधा दिली जाणार आहे.
जाणून घ्या वैशिष्ट्ये :-
- २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज
- रिच ग्रीन आणि रिच ग्रे कलरमध्ये उपलब्ध
- ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
- १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
- २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर
- ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- 5000mAh बॅटरी
- ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर
- किंमत ७ हजार ४९९ रुपये